मुरांबा

muramba movie review

काल “मुरांबा” चाखला. “दोन पिढ्यातील अंतर” हा विषय चिरंजीव आहे. त्याचा परिणाम असा की नवीन पिढीला वाटते की जुनी पिढी “टिपिकल” आहे. पण हे “टिपिकल” असण्यामागचे कारण काय ते कधी जाणून घेण्याचा प्रयत्न मात्र करत नाही. खूपच.. फारच.. अगदीच.. “टिपिकल” असा शिक्का मारून मोकळे व्हायचे. आता हा “टिपिकल” शब्द वारंवार वापरण्याचे कारण म्हणजे तो असाच या चित्रपटात देखील वापरला आहे. चित्रपट मात्र “टिपिकल” नाही.

अलोक आणि इंदू यांचा ब्रेकअप हा या चित्रपटाचा मुख्य विषय. पहिल्या पाच मिनिटांतच आपण या कथेशी जुळतो. वेगळेपणा कुठे जाणवतो तर अलोकचे आई-बाबा ज्या पद्धतीने हा विषय हाताळता तिथे. वादविवाद खूप असले तरीही इथे प्रखरता जाणवत नाही. हलके फुलके पणाने कथानक पुढे जात रहाते. यातूनच हसण्याची संधी परत परत मिळते. मध्यंतरानंतर थोडा वेगळ्या वळणाने कथानक पुढे जाते. अपयशाची चव माहिती नसली तर नात्यांमध्ये काय प्रश्न येऊ शकतात हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. आजच्या या गतीमान जीवनात निर्णय झटकन घेतले जातात. नात्यांविषयी सुद्धा असेच होते. ते किती चुकीचे आहे हे चित्रपटाच्या शेवटी उमगते.

चित्रपटात कुणी अभिनय केलाय असे वाटत नाही. सगळे सहज घडत आहे असे वाटते. प्रेम आहे. रोमांस आहे. पण चवीपुरते. थोडासा बोल्ड आहे म्हणून मला तरी ही फॅमिली फिल्म नाही वाटत. अजून एक गोष्ट. गाणी नाही यांत. “अगं! ऐक ना?” मला मोठ्या पडद्यावर बघायचे होते. ते पण नाहीये. बाकी चित्रपट एकदा तरी बघावाच. ८/१०

Share this article

  • Facebook
  • Twitter
  • Delicious
  • Digg
  • StumbleUpon
  • Email
This entry was posted in Marathi\Hindi, Movie Reviews. Bookmark the permalink. Post a comment or leave a trackback: Trackback URL.

Post a Comment

Your email is never published nor shared. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

*
*

:D :) ^_^ :( :o 8) ;-( :lol: xD :wink: :evil: :p :whistle: :woot: :sleep: =] :sick: :love: :kiss: :angel: :bandit: :alien: