Kay Sangu Mhajyabaddal

काय सांगू माझ्या बद्दल

काय सांगू माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
पानात पडेल ते खाल्ल्या शिवाय
पोटच आमच भरत नाही.

काय सांगू माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असतं मला
पण बोलणं मात्र जमत नाही.

काय सांगू माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुखवलं जातं आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.

काय सांगू माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
खोटं खोटं हसता हसता
रडता मात्र येत नाही.

काय सांगू माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुःखात सुख असं समजता
दुःख ही फिरकत नाही.

काय सांगू माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.

काय सांगू माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही.

काय सांगू माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतंच नाहीत.

काय सांगू माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
मांडायचा प्रयत्न करतोय
पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *