Archive for the "Marathi\Hindi" Category
दाढि करण्याइतके स्वर्गसुख कशातच नाही. हे मला कळुन चुकले. एरव्ही मी २-३ दिवसांनी दाढि करतो. पण का कुणास ठाऊक, मला हा नियम तोडवासा वाटला. १५ दिवस मी दाढि केली नाही. ज्यांनी मला ह्या दिवसांत बघितले त्यांनी वेड्यात काढले. एव्हाना तुम्हीही १५ दिवस दाढि न केलेला माणुस कसा दिसत असेल हे मनात बघत असाल. अगदी तसाच…. आज सकाळी ऊठल्यावर आरशात तोंड बघितले. कदाचित आरसा सुद्धा मला बघु इच्छित नव्हता (एरव्ही थोडाच बघु इच्छितो). अथक प्रयत्न केल्यानंतर शेवटि दाढि पुर्ण झाली. तुम्हाला सांगतो, स्वर्गात गेल्यासारखे वाटले.
पण खरी मजा आली ती लोकांच्या प्रतिक्रिया ऐकण्यात. दाढि वाढवल्यावर सर्वात पहिली प्रतिक्रिया म्हणजे प्रेमात वेडा झाल्याची. कोण रे ती?? काय म्हटले तिने?? मनावर घेऊ नकोस. हसण्यासाठी चांगले खाद्य मिळाले. काहिंनी मला साधु होतोस की काय हा प्रश्न सुद्धा केला. म्हणजे साधु होण्यासाठी दाढि असावी लागते. ज्यांनी कधी दाढी वाढवली नसेल त्यांनी एकदा वाढवुन बघा. अर्थात हे फ़क्त पुरुषांसाठीच.
हा माझ्या इंग्रजी पोस्टचा अनुवाद आहे. करावासा वाटला.
आज Valentines day. बहुतेक तरुण मंडळी हा दिवस आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी “वापरतात”. मी असले “दिवस” साजरे करण्याच्या विरुद्ध आहे. वेळ बदलत आहे. माणुस पैश्यामागे वेडा होत चालला आहे. आणि त्यामुळे त्याला आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे हे दिवस जन्माला आले. त्यामुळेच Mothers day, Fathers Day, Peace Day, Friendship Day (माफ़ करा Friendship week) असे दिवस साजरे केले जातात.
पण अशा दिवसांसाठी थांबायचे का? तुम्हाला जर काहि बोलायचे आहे, प्रेम व्यक्त करायचे आहे, तर ते सरळ का बोलले जात नाही. हा संकोच फ़क्त दोन माणसांमध्ये अंतर निर्माण करतो. अशा “दिवसां” साठी थांबु नका.
प्रेम व्यक्त करा.
Think Nonsense..

![[del.icio.us]](http://www.thinknonsense.com/bb/wp-content/plugins/bookmarkify/delicious.png)
![[Digg]](http://www.thinknonsense.com/bb/wp-content/plugins/bookmarkify/digg.png)
![[Reddit]](http://www.thinknonsense.com/bb/wp-content/plugins/bookmarkify/reddit.png)
![[StumbleUpon]](http://www.thinknonsense.com/bb/wp-content/plugins/bookmarkify/stumbleupon.png)
![[Technorati]](http://www.thinknonsense.com/bb/wp-content/plugins/bookmarkify/technorati.png)


![[del.icio.us]](http://www.thinknonsense.com/bb/wp-
content/plugins/bookmarkify/delicious.png)
![[Digg]](http://www.thinknonsense.com/bb/wp-
content/plugins/bookmarkify/digg.png)
![[Technorati]](http://www.thinknonsense.com/bb/wp-
content/plugins/bookmarkify/technorati.png)


