Kay Sangu Mhajyabaddal

काय सांगू माझ्या बद्दल

काय सांगू माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
पानात पडेल ते खाल्ल्या शिवाय
पोटच आमच भरत नाही.

काय सांगू माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असतं मला
पण बोलणं मात्र जमत नाही.

काय सांगू माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुखवलं जातं आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही. Continue reading →